पोस्ट्स

“शेतकऱ्यांसाठी १० महत्त्वाच्या सरकारी योजना; अर्ज कुठे आणि कसा करावा?”

इमेज
शेतकऱ्यांसाठी १० महत्त्वाच्या सरकारी योजना; अर्ज कुठे आणि कसा करावा? नमस्कार मंडळी! आजच्या लेखात आपण शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाढता शेती खर्च, खते-बियाण्यांचे दर, सिंचनाची समस्या, नैसर्गिक आपत्ती आणि आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सिंचन सुविधा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी यंत्रसामग्री तसेच पीक संरक्षणासाठी मदत मिळवून देतात. चला तर मग, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या १० महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती जाणून घेऊया . १. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अर्ज कुठे करावा? या योजनेअंतर्गत उपलब्ध कृषी घटकांसाठी MahaDBT Farmer Portal वर अर्ज करता येतो. शेतीसाठी काय उपयोग? शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक सिंचन पद्धतींना प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे कम...

शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता कधी ?

इमेज
कधी होणार जमा तुमच्या बॅक खात्यावर शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हफ्ता ? किती दिवस सरकार शेतकऱ्यांना प्रतिक्षा लावणार ?     नमस्कार मंडळी, आपल्याला माहित असेल कि PM Kisan चे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी चे तीन हप्ते असतात. आणि ती केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे तीन हप्ते असतात. असे एकूण सहा हप्ते शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून आर्थिक साहाय्य म्हणून मिळत असतात. आता देशात ज्या प्रकारे महागाई वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पैश्याची थोडीफार का म्हणत नाही तरी मदत होते. जून - जुलै हा शेतीचा पेरणी चा काळ असतो. त्यासाठी बियाणे लागते. कापूस लावण्यासाठी मजुरी लागते अश्या परिस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे दिसते. परंतु हा लांबणीवर पडणारा हप्ता फार शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे तसेच मजुरांसाठी लागणारी मजुरी ही ह्या जून - जुलै महिन्यात लागते.              तुम्हाला माहित असेलच की पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शे...

शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंत कर्जमाफी आणि सोबत 50 हजार ?

इमेज
कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा महाराष्ट्र राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कर्जमाफीची घोषणा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना असे या योजनेचे नाव आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती अस्थिर बाजार भाव या मुळे बळीराजा संकटात सापडला आहे. म्हणून ह्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो.  ह्या कर्जमाफी योजनांमुळे ज्या शेतकऱ्यांनीचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेले २ लाखांपर्यंतचे सर्व माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले सरकारी बँक आणि सहकारी संस्था चे कर्ज माफ होणार आहे. या योजनेत महत्वाचा मुद्दा असा आहे की नियमितपणे कर्ज भरणारे शेतकऱ्यांचा विसर ह्या योजनेत सरकारला पडलेला नाही. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ५० हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबत राज्यातील बँक सेवा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय सरकार घेणार आहे. श...