शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंत कर्जमाफी आणि सोबत 50 हजार ?
कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा महाराष्ट्र राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कर्जमाफीची घोषणा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना असे या योजनेचे नाव आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती अस्थिर बाजार भाव या मुळे बळीराजा संकटात सापडला आहे. म्हणून ह्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. ह्या कर्जमाफी योजनांमुळे ज्या शेतकऱ्यांनीचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेले २ लाखांपर्यंतचे सर्व माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले सरकारी बँक आणि सहकारी संस्था चे कर्ज माफ होणार आहे. या योजनेत महत्वाचा मुद्दा असा आहे की नियमितपणे कर्ज भरणारे शेतकऱ्यांचा विसर ह्या योजनेत सरकारला पडलेला नाही. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ५० हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबत राज्यातील बँक सेवा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय सरकार घेणार आहे. श...