शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंत कर्जमाफी आणि सोबत 50 हजार ?

कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा महाराष्ट्र राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कर्जमाफीची घोषणा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना असे या योजनेचे नाव आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती अस्थिर बाजार भाव या मुळे बळीराजा संकटात सापडला आहे. म्हणून ह्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. 





ह्या कर्जमाफी योजनांमुळे ज्या शेतकऱ्यांनीचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेले २ लाखांपर्यंतचे सर्व माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले सरकारी बँक आणि सहकारी संस्था चे कर्ज माफ होणार आहे. या योजनेत महत्वाचा मुद्दा असा आहे की नियमितपणे कर्ज भरणारे शेतकऱ्यांचा विसर ह्या योजनेत सरकारला पडलेला नाही. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ५० हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहन पर लाभ देण्याबाबत राज्यातील बँक सेवा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय सरकार घेणार आहे. शेतकरी कर्जबाजारी न होता कायमचा कर्जमुक्त कसा होईल याचा विचार करून समिती शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा विकास दर ७.९ टक्के आहे. विकासदर वाढवण्यासाठी राज्यातील कृषी , उद्योग , आणि सेवा ह्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे गरजेचे आहे. कृषी , उद्योग, आणि सेवा ह्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास महाराष्ट्राचा विकास दर वाढण्यास नक्की मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शेतीसाठी दोन प्रकारचे कर्ज असतात एक पीक आणि दुसरे मुदत कर्ज तर मुदत कर्ज ला ह्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही केवळ पीक कर्जालाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे


मुदत कर्ज आणि पीक कर्ज यातील फरक

मुदत कर्ज म्हणजे तुम्ही शेतीवर ट्रॅक्टर, अवजारे, गाडी, घर यासाठी घेतलेले कर्ज असेल तर ह्या कर्जाला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही.

पीक कर्ज म्हणजे तुम्ही पीक देखभालीसाठी साठी घेतलेले कर्ज त्यासाठी शेतात कुठल्याही प्रकारचे पीक असो कापूस, केळी, आंबा, इत्यादी कुठल्याही प्रकारची पिके घेतली असतील. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी असलेल्या अटी

१) ज्या शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी कर्ज घेतले असेल आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत फेडले नसेल तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.

२) ज्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज फेडले असेल अशा शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन पर योजनेचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही 

१) ज्या शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ नंतर कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज फेडले असेल किंवा नसेल अश्या प्रकारच्या कोणत्याही शेतकऱ्यांला कर्जमाफी योजना आणि ५० हजार प्रोत्साहन पर योजनेचा लाभ मिळणार नाही.

२) २ लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना हि कर्जमाफी लागू नाही.

म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्या शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी कर्ज घेतले असेल आणि १ सप्टेंबर २०२५ पर्यंत फेडले नसेल आणि शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जाची रक्कम २ लाखांच्या आत असेल अश्या प्रकारच्या शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफी योजनाचा लाभ मिळणार आहे 

तर दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटना तर काही शेतकरी नेते मंडळी कडून या कर्जमाफी योजने वर टीका होत होत आहे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक आहे असे सांगितले जात आहे.

कारण फळबाग लागवड साठी लागणारा खर्च हा दोन लाखांपेक्षा जास्त असतो तर दोन लाखांपर्यंत असणारी ही कर्जमाफी योजना फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे असे लक्षात येते.

नियमित कर्ज भरणारे शेतकरी हे काही श्रीमंत शेतकरी नसतात पण पुढील हंगामासाठी आपल्याला कर्ज मिळाले पाहिजे म्हणून जे शेतकरी घरातील असेल नसेल त्या गोष्टी विकून यांच्या त्यांच्या कडून पैसे उधार घेऊन कर्ज फेडतात अश्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे असे सांगितले जात आहे 

 



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता कधी ?

“शेतकऱ्यांसाठी १० महत्त्वाच्या सरकारी योजना; अर्ज कुठे आणि कसा करावा?”