शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हप्ता कधी ?
कधी होणार जमा तुमच्या बॅक खात्यावर शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हफ्ता ?
किती दिवस सरकार शेतकऱ्यांना प्रतिक्षा लावणार ?
नमस्कार मंडळी, आपल्याला माहित असेल कि PM Kisan चे म्हणजे पीएम किसान सन्मान निधी चे तीन हप्ते असतात. आणि ती केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे तीन हप्ते असतात. असे एकूण सहा हप्ते शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून आर्थिक साहाय्य म्हणून मिळत असतात. आता देशात ज्या प्रकारे महागाई वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पैश्याची थोडीफार का म्हणत नाही तरी मदत होते. जून - जुलै हा शेतीचा पेरणी चा काळ असतो. त्यासाठी बियाणे लागते. कापूस लावण्यासाठी मजुरी लागते अश्या परिस्थितीत हा हप्ता शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे दिसते. परंतु हा लांबणीवर पडणारा हप्ता फार शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे तसेच मजुरांसाठी लागणारी मजुरी ही ह्या जून - जुलै महिन्यात लागते.
तुम्हाला माहित असेलच की पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे वाटप एका वर्षात दर चार महिन्यांत होते साधारण पणे प्रत्येक वेळी ₹ २००० मिळतात.
पीएम किसान सन्मान निधीचे एकूण तीन हप्ते प्रत्येक वेळी ₹ २००० × ३ = ६०००
नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण तीन हप्ते प्रत्येक वेळी ₹ २००० × ३ = ६०००
PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन्ही योजनेचे मिळून एकूण ६ हप्ते
पीएम किसान सन्मान निधीचे एकूण तीन हप्ताचे ₹ ६००० ( ३ हप्ते )
नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण तीन हप्ताचे ₹ ६००० ( ३ हप्ते )
असे दोन्ही योजनेचे मिळून वर्षाला ₹ १२००० ( पात्र शेतकऱ्यांसाठी )
पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे वाटप दर वर्षाला पुढील प्रमाणे होते. भारतात आर्थिक वर्षाची सुरुवात हि १ एप्रिलला होते. १ एप्रिल हे आपले आर्थिक वर्ष आहे म्हणून ह्या शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा एप्रिल महिन्यात येतो
पुढील प्रमाणे वर्षातील वाटप असते
| कालावधी | पीएम किसान | नमो शेतकरी |
|---|---|---|
| एप्रिल – जुलै | ₹2,000 | ₹2,000 |
| ऑगस्ट – नोव्हेंबर | ₹2,000 | ₹2,000 |
| डिसेंबर – मार्च | ₹2,000 | ₹2,000 |
| एकूण | ₹6,000 | ₹6,000 |
पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा मागील हप्ता हा जून २०२६ ला जमा झाला होता तो पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा २३ वा हप्ता होता आता वरील दिलेल्या तक्ता नुसार पुढील हप्ता हा ऑक्टोबर २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर होऊ शकतो
